अफवांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे पोलीस पाटील, सरपंचांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:05 IST2018-07-02T13:05:26+5:302018-07-02T13:05:59+5:30
सर्तक राहण्याचे पोलीस प्रशासनाने केले आवाहन

अफवांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे पोलीस पाटील, सरपंचांची बैठक
चाळीसगाव, जि. जळगाव - साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे अफवेमुळे जमावाने पाच जणांची क्रुर हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील सर्व सरपंच व पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली.
सोशल माध्यमांवरुन पसरविले जाणारे चुकीचे संदेश, मुले चोराणारी टोळी सजून भीक्षूकी मागणा-या लोकांवर होणारे हल्ले याबाबत सर्तकता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. सोशल माध्यमांवर संदेश लवकर व्हायरल होत असल्याने याबाबत खबरदारी घ्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीस चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, प्रांताधिकारी शरद पवार, डीवायएसपी अरविंद पाटील, पोनि रामेश्वर गाढे पाटील, तहसीलदार कैलास देवरे, वाहतूक शाखेचे प्रमुख सुरेश शिरसाट, मेहुणबारे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश शिरसाट यांच्यासह शहर, ग्रामीण, मेहुणबारे पोलीस स्टेशन मधील कर्मचारी उपस्थित होते.
सोशल मीडियावर कशा प्रकारे चुकीचे संदेश पसरविले जातात. याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चुकीच्या संदेशांबाबत काय उपाय करायचे. याबाबतही सूचना देण्यात आल्या. काही सरपंच व पोलीस पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.