पाळधी येथील पोलीस कॉन्स्टेबलला पंधरा हजाराची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 15:06 IST2021-01-11T15:05:23+5:302021-01-11T15:06:01+5:30
सुमीत पाटील या पोलिस कॉन्स्टेबलला सोमवारी एसीबीच्या पथकाने १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

पाळधी येथील पोलीस कॉन्स्टेबलला पंधरा हजाराची लाच घेताना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : तालुक्यातील पाळधी येथील पोलीस स्थानकात कार्यरत सुमीत पाटील या पोलिस कॉन्स्टेबलला सोमवारी एसीबीच्या पथकाने १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त वाहन सोडण्यासह अपघाताच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागण्यात आली होती.
तक्रारदाराच्या चालकाकडून काही दिवसांपूर्वी अपघात होवून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चारचाकी वाहन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी गुन्ह्यातील वाहन सोडण्यासह आरोपी चालकाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी पो. कॉ. सुमीत पाटील यांनी लाच मागितली होती. मात्र लाच द्यावयाची नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.