वावडे येथे पोलीस पाटलाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 14:20 IST2020-04-18T14:19:06+5:302020-04-18T14:20:34+5:30

पोलीस पाटलाला दोघांनी मारहाण केली.

Police beat up Patil at Wawde | वावडे येथे पोलीस पाटलाला मारहाण

वावडे येथे पोलीस पाटलाला मारहाण

ठळक मुद्देबिना मास्क फिरत असताना केली विचारपूसराग येऊन शिवीगाळ अन् मारहाण

अमळनेर : तोंडाला मास्क लावला नाही म्हणून सांगायला गेलेल्या पोलीस पाटलाला दोघांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना १७ रोजी सकाळी साडेनऊला वावडे, ता.अमळनेर येथे घडली.
दत्तात्रय लोटन ठाकरे हे वावड्याचे पोलीस पाटील आहेत. गावातील अनिल शालिग्राम पाटील व प्रभाकर सुभाष पाटील हे दोघे बिना मास्क गावात फिरत होते. तेव्हा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्यांना हटकले. यावर दोघांनी अश्लील हावभाव करून शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आठ हजार ४०० रुपयांचे नुकसान केले म्हणून पोलीस पाटील दत्तात्रय ठाकरे यांनी फिर्याद दिली. त्यावरून मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि राहुल फुला करीत आहेत.
 

Web Title: Police beat up Patil at Wawde