Police arrested for murder of wife | पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसाला अटक
पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसाला अटक

ठळक मुद्देआई, वडील फरार  अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव : पतीच्या खुनाचा आरोप असलेल्या प्रशांत प्रकाश पाटील (२६, रा.नेहरु नगर,जळगाव) या पोलीस कर्मचाºयाला रविवारी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात प्रशांतची आई प्रतिभा व वडील प्रकाश पंडित पाटील हे फरार आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने यापूर्वी फेटाळला आहे. 
 प्रशांत पाटील  शनी पेठ पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. पत्नी भाग्यश्रीला नोकरी लावण्यासाठी माहेरुन २५ लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्यांनी छळ करुन तिला गळफास लावून ठार मारल्याची तक्रार वडील अरुण जगन्नाथ पाटील (रा.सौंदाणे, ता.धुळे ह.मु.धुळे) यांनी दिली होती. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्रशांत पाटील व त्याच्या आई, वडीलांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. २७ आॅगस्टच्या रात्री ही घटना घडली होती. गुन्हा घडल्यापासून तिघं संशयित फरार होते. प्रशांत पाटील रविवारी एमआयडीसी पोलिसांना शरण आला.दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर अडीच महिने उलटले तरी संशयितांना अटक होत नसल्याने या गुन्ह्याचा तपास निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्याकडून काढून तो दुसºयाकडे द्यावा यासाठी भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
 

Web Title: Police arrested for murder of wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.