जळगावात अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:05 IST2018-09-04T14:05:18+5:302018-09-04T14:05:21+5:30
कारागृहात केली रवानगी

जळगावात अश्लिल वर्तन करणाऱ्या पोलिसाला अटक
जळगाव : हरिविठ्ठल नगरात २८ वर्षीय महिलेशी तिच्याच घरात जाऊन अश्लिल वर्तन करणाºया योगेश वाघ या पोलिसाला रविवारी रात्री अटक करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.
वाघ याने २२ आॅगस्ट रोजी महिलेशी अश्लिल वर्तन केले होते. त्याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनलाच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात पोलीस अधीक्षकांनी त्याला तडकाफडकी निलंबित केले होते. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर वाघ याने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. अटकेशिवाय कोणताच पर्याय नसल्याने पोलिसांनी त्याला रविवारी अटक केली. न्यायालयाने कारागृहात पाठविण्याचे आदेश दिल्यानंतर वाघ याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी त्याला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात आणले होते.