जळगाव - महानगरपालिकेत भाजपाने मिळवलेल्या अभुतपुर्व यशानंतर भाजपा नेते व कार्यकर्त्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जळगाव व सांगली महानगरपालिकेत भाजपाने मिळवलेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या टिट्वटर अकांउट वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी म्हटले आहे की, महाराष्टÑाच्या जनतेने भाजपावर विश्वास कायम दाखवला असून, जनतेला नेहमीच भाजपला संधी दिली जात आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या मेहनतीचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्यांच्यासह महाराष्टÑातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे देखील त्यांनी कौतुक केले आहे. भाजपाच्या विजयाबद्दल शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे व सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले होते. तसेच जळगाव शहराच्या विकासाचे आश्वासन देखील त्यांनी दिले.
पंतप्रधानांनी केले जळगावच्या विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 14:32 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जळगाव व सांगली महानगरपालिकेत भाजपाने मिळवलेल्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी केले जळगावच्या विजयाबद्दल भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिट्वटरवरून दिल्या शुभेच्छामुख्यमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्षांचे केले अभिनंदनमुख्यमंत्र्यांनी दिले जळगावच्या विकासाचे दिले आश्वासन