साळव्यात मुख्य रस्त्याची दुर्दशा, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:37+5:302021-07-14T04:19:37+5:30
नांदेड, ता. धरणगाव : साळवा येथे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची कमालीची दुर्दशा झाली आहे. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास ...

साळव्यात मुख्य रस्त्याची दुर्दशा, नागरिक त्रस्त
नांदेड, ता. धरणगाव : साळवा येथे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची कमालीची दुर्दशा झाली आहे. परिणामी, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
साळवा बसस्थानकापासून साळवा फाट्याकडे गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची जि.प. शाळेपर्यंत कमालीची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरील खडी व डांबर उखळून ठिकठिकाणी मोठाले खड्डे निर्माण झालेले आहेत. परिणामी, पाऊस आल्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यावरून पायी चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असताना सा.बां. विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेल्याने वाहनचालकांसह नागरिकांनाही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकापासून ते शाळेपर्यंतच्या रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून केली जात आहे.
130721\13jal_2_13072021_12.jpg
साळवा येथील गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अशी दुर्दशा झाली आहे.