अमृत योजनेचे पाईप जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 21:05 IST2020-12-03T21:05:42+5:302020-12-03T21:05:53+5:30
जळगाव - कचरा पेटविल्यामुळे बाजूला पडून असलेल्या अमृत योजनेच्या पाईपांना आग लागल्याची घटना गुरूवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास ...

अमृत योजनेचे पाईप जळाले
जळगाव- कचरा पेटविल्यामुळे बाजूला पडून असलेल्या अमृत योजनेच्या पाईपांना आग लागल्याची घटना गुरूवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास ममुराबाद रस्त्यावरील लेंडीनाल्याजवळ घडली.
सध्या शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. त्यामुळे ज्याठिकाणी कामे सुरू आहेत. त्याठिकाणी पाईप ठेवण्यात आलेली आहेत. गुरूवारी लेंडी नाल्याजवळ कुणीतरी कचरा पेटविला. त्यामुळे जवळच ठेवलेल्या अमृत योजनेच्या पाईपांना आग लागली. हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे अग्निशमनचे बंब बोलवून त्यावर पाण्याचा मारा करण्यात आला. यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सुदैवाने कुठलीही हानी झालेली नाही.