रेल्वेच्या धक्क्याने पिंप्राळ्यातील वृध्दाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 19:59 IST2020-02-10T19:59:36+5:302020-02-10T19:59:47+5:30

जळगाव : रेल्वे रुळ ओंडालतांना खंडेराव नगराजवळ रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने गोपालदास किसनदास बैरागी (८२, रा.कुंभारवाडा, पिंप्राळा)या वृध्दाचा मृत्यू ...

 Pimpri elderly dies by train wreck | रेल्वेच्या धक्क्याने पिंप्राळ्यातील वृध्दाचा मृत्यू

रेल्वेच्या धक्क्याने पिंप्राळ्यातील वृध्दाचा मृत्यू

जळगाव : रेल्वे रुळ ओंडालतांना खंडेराव नगराजवळ रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने गोपालदास किसनदास बैरागी (८२, रा.कुंभारवाडा, पिंप्राळा)या वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी रामानंद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास खंडेराव नगर जवळून रेल्वे रुळ ओंडालत असतांना रेल्वे खांब क्र. ४१७/१६ जवळ समोरुन येणाऱ्या रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने बैरागी यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे चालकाने स्टेशन मास्तर यांना माहिती दिल्याने रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. येथे मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तपास हवालदार रवी नरवाडे करीत आहेत.

Web Title:  Pimpri elderly dies by train wreck