पारोळा येथे पायलट कल्याणी पाटील हिचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 14:41 IST2021-08-14T14:39:48+5:302021-08-14T14:41:41+5:30

ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करीत राहा-कल्याणी पाटील हिचे मनोगत

Pilot Kalyani Patil honored at Parola | पारोळा येथे पायलट कल्याणी पाटील हिचा सन्मान

पारोळा येथे पायलट कल्याणी पाटील हिचा सन्मान



पारोळा : मोंढाळे, ता. पारोळा येथील कन्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये वैमानिक झाल्याने तिचा जैन नवयुवक मंडळ व व्यापारी महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रतिकूल परिस्थितीतही वडिलांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखविला. तो विश्वास सार्थ ठरवत, मी ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम घेतले. म्हणून स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वानी कठोर परिश्रम घ्या, यश हे हमखास मिळते, असे मत वैमानिक कल्याणी पाटील हिने सत्काराला उत्तर देताना मांडले.
यावेळी उद्योजक उमेश जैन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, उपाध्यक्ष अशोक लालवाणी, कैलास पाटील, बालाजी संस्थानचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, रोशन शहा, आकाश महाजन, संदीप धमके, कमलेश लुनावत, संजय कासार, दिनेश गुजराथी, हरीश जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
नगरसेवक नितीन सोनार, सुनील भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

Web Title: Pilot Kalyani Patil honored at Parola