खिडकीतून पाईपच्या सहाय्याने पॅँट ओढली अन् त्यातील पैसे व चावी काढून कार लांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 09:12 PM2019-12-09T21:12:05+5:302019-12-09T21:12:19+5:30

खेडी येथील प्रकार : सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कार कैद

 Picked the pants with a pipe through the window and removed the money and keys from it and extended the car | खिडकीतून पाईपच्या सहाय्याने पॅँट ओढली अन् त्यातील पैसे व चावी काढून कार लांबविली

खिडकीतून पाईपच्या सहाय्याने पॅँट ओढली अन् त्यातील पैसे व चावी काढून कार लांबविली

Next

जळगाव : खिडकीतून लोखंडी पाईपच्या सहाय्याने टांगलेली पॅन्ट ओढून त्यातील कारची चावी व चार हजाराची रोकड काढून चोरट्यांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक स्वप्नील रामचंद्र पवार यांच्या मालकीची अंगणात लावलेली कार लांबविल्याचा प्रकार खेडी येथे घडला आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कार महामार्गावरील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल पवार हे आई,वडील,पत्नी, भाऊ, वहिणी याच्यासह खेडी येथे वास्तव्यास आहे. एमआयडीसीत नवीन गुरांचे बाजारासमोर त्यांचे एस.पी.रोडलाईन्स या नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे.भाऊ जैन इरिगेशनमध्ये नोकरीला असून त्यांची बदली दिल्ली येथे झाली आहे. तेव्हापासून स्वप्निल पवार हे भावाच्या मालकीची कार (क्र एम.एच.१९.बी.जे.९९७७) स्वत: वापरत आहेत. ६ डिसेंबर रोजी मित्रासोबत हॉटेलात जेवण करुन पवार यांनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कार नेहमीप्रमाणे घरासमोर पार्किंग केली होती.

अंगणात पॅँट फेकली आणि कार गायब
पवार दुसºया दिवशी सकाळी झोपेतून उठले असता पॅँट अंगणात फेकली होती तर कार गायब झालेली होती. परिसरात कारचा शोध घेतला मात्र मिळून आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता खेडी पेट्रोलपंपाजवळ असलेल्या बिर्ला सिमेंट व आसारीचे दुकानाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात ७ रोजी पहाटे ३.३३ वाजेच्या सुमारास कार अजिंठा चौफुलीकडे जात असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी स्वप्निल पवार यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ लाखांची कार, पॅन्टमधील ४ हजार रुपये रोख तसेच पॅनकार्ड असा२ लाख ४ हजाराचा ऐवज लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title:  Picked the pants with a pipe through the window and removed the money and keys from it and extended the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.