शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सातपुड्यातील आदिवासींचा ‘फगवा उत्सव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 19:47 IST

सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या पारंपरिक धार्मिक उत्सव तथा चालीरीतीचे जतन करतात आणि त्यातून जीवनाचा आनंद शोधतात अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उत्सवही वेगळेच असतात.

- जयदेव वानखडेजळगाव जामोद : सातपुड्याच्या कुशीत वसलेले आदिवासी आपल्या पारंपरिक धार्मिक उत्सव तथा चालीरीतीचे जतन करतात आणि त्यातून जीवनाचा आनंद शोधतात अशा या जगावेगळ्या लोकांचे सण, उत्सवही वेगळेच असतात. हिंदू संस्कृतीला धरून असणा-या सर्व धार्मिक परंपरेत त्यांच्या मते फगवा उत्सव हा अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. यासाठी तब्बल पाच दिवस ते आपली कामे सोडून फगव्यात मग्न असतात. यावर्षीही आदिवासी ग्राम उमापूर, काळमाटी, भिंगारा, चारबन, हनवतखेड, रायपूर, गारपेठ, निमखेडी, आदी गावांमध्ये हा फगवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आपल्या पारंपरिक वाद्यांसह पारंपरिक नृत्याने हे आदिवासी शहरवासीयांची मने वेधताना दिसतात. जळगाव शहराच्या उत्तरेस सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये आदिवासींची गावे आहेत. या उत्सवाला हे आदिवासी शहरात येऊन भंग-या मागतात आणि फगवा गोळा करून नेतात.यंदा उमापूर आणि कालमाटी येथील फगवा उत्सवातील आदिवासी शहरात वेगवेगळ्या वेशभूषा करून आणि महिला नृत्य करून अन्नधान्य व देणगी गोळा करीत आहे. होळी पेटल्यानंतर दुस-या दिवसापासून चार दिवस गावागावात फिरून आणि मोठमोठे ढोल वडवून घुंगरांच्या तालावर थिरकत थिरकत आपल्या आदिवासी नृत्यकला आविष्काराचे प्रदर्शन करतात. त्यानंतर त्यांच्या गावामध्ये ही अन्नधान्य गोळा करतात. हे करत असताना कुणावरही त्यांची जबरदस्ती नसते. प्रेमाने जे दिले ते घ्यायचे याप्रमाणे जेवढे अन्नधान्य व पैसा अडका जमा होता त्यामध्ये पाचव्या दिवशी गावामध्ये मोठा भंडारा केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम ६ मार्च रोजी होणार असल्याचे सांगितले.काबाडकष्ट करून जीवन जगणा-या आदिवासीच्या जीवनात हा उत्सव मोठा आनंद निर्माण करतो. बायका मुले, म्हातारी माणसे मोठ्या उत्साहाने यात सहभाग होतात. आदिवासी लोकांना परंपरा जिवंत राहावी, यातून लोकांचे निखळ मनोरंजन व्हावे आणि आदिवासी बांधवांमधील एकोपा कायम राहावा, यासाठी आम्ही काही ठरावीक मंडळी स्वत: पुढाकार घेऊन फगवा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो.- केशवसिंग राऊत - शिक्षक उमापूर

आमदार हर्षवर्धन सपकाळांचाही सहभागसंग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्यातील पर्वत राजीत पारंपरिक रहिवाशी असलेल्या आदिवासी बांधवांच्या फगवा या होळीनंतर ८ दिवस साजरा होणा-या उत्सवाचे चालठाना येथे आयोजन करण्यात आले होते. या पारंपरिक उत्सवात आमदार हर्षवर्धन सपकाळ हे आज सहभागी झाले.