जळगावात झाडाला दुचाकी बांधुन पेट्रोल दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 20:03 IST2018-05-24T20:03:27+5:302018-05-24T20:03:27+5:30

काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

Petrol price hike protests in Jalgaon Congress | जळगावात झाडाला दुचाकी बांधुन पेट्रोल दरवाढीचा निषेध

जळगावात झाडाला दुचाकी बांधुन पेट्रोल दरवाढीचा निषेध

ठळक मुद्देकाँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाडाला दुचाकी बांधुन केंद्र सरकारविरोधात निषेध

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२४ : गेल्या काही दिवसांपासुन पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ जळगांव ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी झाडाला दुचाकी बांधुन केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता तहसील कार्यालयासमोर जळगांव तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय वराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
तहसील कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडाला दोन दुचाकी बांधुन, भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर तहसीलदार अमोल निकम यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी अध्यक्ष संजय वराडे यांच्यासह उपाध्यक्ष पाटील, राहुल जाधव, गोपाळ मिस्तरी, प्रमोद नरवाडे, राजु पाटील, आनंद रंधे, योगेश रंधे, अजय सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Petrol price hike protests in Jalgaon Congress