Personality Development Camp at Newton Maratha College of Education | नुतन मराठा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात व्यक्मितत्व विकास शिबिर
नुतन मराठा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात व्यक्मितत्व विकास शिबिर

जळगाव- नुतन मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालयात नुकतेच तीन दिवशीय व्यक्तिमत्त्व शिबिर पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या एस.डी.सोनवणे तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. जयश्री नेमाडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील छात्राध्यापकांनी स्वागत गीत सादर केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर आपले विचार मांडले. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांची शारीरिक, बौध्दीक व सामाजिक स्थितीचा अभ्यास करुन मार्गदर्शन करण्याविषयी माहिती दिली. यावेळी प्रा. डी. आर. पाटील, प्रा. संजय नन्नवरे, प्रा. आर.एल.निळे, प्रा. डॉ. एस.बी.पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 


Web Title: Personality Development Camp at Newton Maratha College of Education
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.