डोळ्यात मिरचीची पूड फेकून दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:42 IST2020-02-03T23:41:24+5:302020-02-03T23:42:48+5:30

भांडणाबाबत चौकशी करायला गेलेल्या एकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून टाकरखेड्याच्या दोघांना सहा जणांनी कुºहाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून फ्रॅक्चर केली.

Peppermint in the eye and beating both | डोळ्यात मिरचीची पूड फेकून दोघांना मारहाण

डोळ्यात मिरचीची पूड फेकून दोघांना मारहाण

ठळक मुद्देएकाला केले फ्रॅक्चरसहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

अमळनेर, जि.जळगाव : भांडणाबाबत चौकशी करायला गेलेल्या एकाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून टाकरखेड्याच्या दोघांना सहा जणांनी कुºहाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून फ्रॅक्चर केल्याची घटना ३१ रोजी सायंकाळी साडेसहाला शहरातील गोहिलनगर भागात घडली. याबाबत ३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर रंगराव पाटील रा.टाकरखेडा यांचे दगडी दरवाज्याजवळ फर्निचरचे दुकान आहे. ३१ रोजी त्यांना शहरातील गोहिल नगर भागात राहणाऱ्या त्यांच्या भावजयीचा फोन आला की, गल्लीतील राजेंद्र लोटन पाटील, सुभाष श्रीधर पाटील, आशाबाई राजेंद्र पाटील, प्रशांत गणेश पाटील हे तिला आणि आई-वडिलांना शिवीगाळ करीत आहेत, भांडण करीत आहेत. म्हणून किशोर पाटील हे त्यांचा मित्र सुनील सुतार याला घेऊन गेले व भांडणाचा जाब विचारला. तेव्हा आशाबाई राजेंद्र पाटील यांनी किशोरच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली व अनोळखी व्यक्तीने पकडून ठेवत राजेंद्र पाटील याने कुºहाडीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुºहाडीच्या लाकडी दांड्याचा मनगटावर वार लागल्याने मनगट फ्रॅक्चर झाले. सुनील भांडण सोडवायला गेला असता प्रशांतने लाकडी दांड्याने सुनीलला मारहाण केल्याने तोही जखमी झाला. तसेच सुभाषने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत किशोरने फिर्याद दिली. त्यावरून राजेंद्र, सुभाष, आशाबाई व प्रशांत यांच्यासह अज्ञात दोन अशा सहा जणांविरुद्ध दंगलीचा व जबर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक राजेश चव्हाण करीत आहेत

Web Title: Peppermint in the eye and beating both