शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

लोकसंघर्ष, सेना कार्यकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:11 IST

जळगाव :शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून विना परवानगी आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच किसान मुक्ती आंदोलनप्रकरणी ...

जळगाव :शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर कर्नाटक सरकारचा निषेध म्हणून विना परवानगी आंदोलन करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच किसान मुक्ती आंदोलनप्रकरणी लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना जिल्हा पेठ पोलिसांनी अटक करुन लागलीच सुटका केली. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या.अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे जळगाव, धुळे, नंदुरबारसह गुजरात राज्यात ७०० गावांमध्ये किसान मुक्ती आंदोलन करण्यात आले. जळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधवांनी नृत्य करुन लक्ष वेधले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन म्हणून पोलिसांनी आंदोलन करणाºया लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, लोटू सपकाळे, उमाकांत वाणी, अमोल कोल्हे, विनोद देशमुख, भारत ससाणे, सचिन धांडे, प्रमोद पाटील, किरण वाघ, सुमीत साळुंखे, अनिल सपकाळे यांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मुबंई पोलीस अ‍ॅक्ट कलम ६८ नुसार त्यांना ताब्यात घेवून कलम ६९ नुसार त्यांची सुटका करण्यात आली होती. जळगाव तालुका तसेच महानगर शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येवून घोषणाबाजी करण्यात आली होती. शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, दिनेश जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, सभापती नंदलाल पाटील, डॉ. कमलाकर पाटील, जनार्दन कोळी, ईश्वर राजपूत, माजी महानगर प्रमुख प्रकाश बेदमुथा यांना ताब्यात घेवून लगेच सुटका करण्यात आली.विना परवानगी आंदोलन; शिवसैनिकांवर गुन्हाजळगाव : कर्नाटक येथील भाजपा सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून शिवरायांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ महानगरपालिकेसमोर विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या १६ ते १८ कार्यकर्त्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ९ आॅगस्ट रोजी शिवसेनेने मनपासमोर कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, दिनेश जगताप, गणेश गायकवाड, ईश्वर राजपूत, जाकीर पठाण, नितीन सपके, हेमंत महाजन, पूनम राजपूत, ज्योती शिवदे, सारीका माळी यांच्यासह ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव