शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

कोविड रुग्णालयाची लोकांना भीती नाही, परिस्थितीत बदल - डॉ़ दत्तात्रय बिराजदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 1:38 PM

साहित्य, सहायक आले, रुग्णांची काळजी

मुबलक साहित्य, रुग्णांना सहकार्यासाठी पूर्ण वेळ साहाय्यक, अशा विविध पातळ्यांवर उपाययोजना झाल्या असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत लोकांच्या मनात किंचितही भीती राहिलेलेली नाही, स्वत: आम्ही रुग्णांशी बोलून हे जाणून घेत असतो़ अशी माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार यांनी दिली़ ‘लोकमत’ने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ही बदलेली परिस्थिती मांडली.प्रश्न : गंभीर घटना घडल्यानंतर हे पद आले काय वाटते ?डॉ़ बिराजदार : ज्या काही घटना घडल्या त्या अत्यंत दुर्दैवी होत्या़ त्यात कारवाईही झाली, मात्र, सर्वच डॉक्टर हे पूर्ण मेहनतीने काम करीत होते. यात शंका नाही़मात्र, जे झाले ते दुर्दैवी आहे़ अशा स्थितीत ही जबाबदारी आली आहे़ अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक रुग्णांवर लक्ष ठेवणे, प्रत्येकाच्या समस्या समजून घेणे, या बाबी या रुग्णालयात कटाक्षाने पाळल्या जात आहे़प्रश्न : तुम्ही छाती विकारांचेही तज्ज्ञ आहात त्याचा कसा उपयोग होतो?डॉ़ बिराजदार : कोरोनात रुग्णांना नेमकया काय अडचणी आहेत, त्या कशा सोडविल्या पाहिजे, याबाबत राऊंड घेत असतानाच डॉक्टरांना जागीच मार्गदर्शन करणे सोपे होते़ रुग्णांवर उपचार करणे सोपे जाते़सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हा राऊंड असतो, यात केवळ परिस्थिती न बघता रुग्णांची स्थिती त्याबाबतची सर्व माहिती शिवाय सर्व कक्षांमधील अन्य बाबींची बारकाईने पाहणी, या प्रशासकीय बाबीस वैद्यकीय कामही सोबतच होत असल्याने या राऊंडमध्ये अशी दुहेरी जबाबदारी एका वेळी पार पाडण्यास मदत होते़मृत्यूदर घटला आहे का? त्यासाठी उपाययोजना काय केल्या व आवश्यकता काय आहे?डॉ़ बिराजदार : १२ ते १३ टक्क्यांवर गेलेला मृत्यूदर आजच्या घडीला साडे पाच टक्क्यांवर आहे़ रुग्णालयातील २५० बेड हे सेंट्रल आॅक्सिजन सिस्टीम अंतर्गत आहेत़ तब्बल ७० व्हेंटीलेटर्स रुग्णालयाला उपलब्ध झाले आहेत़ ज्या बेडवर रुग्णांला व्हेंटीलेटर्सची गरज त्या ठिकाणी ते पुरविले जाते़ याचा अर्थ सर्वच बेड हे आयसीयू अंतर्गत आहे, असे म्हणता येईल़ बेड साईड अस्टिंट नेमण्यात आले आहे़ ते जागेवरच सर्व सुविधा अत्यवस्थ रुग्णांना देत आहे़ या सर्व बाबींनी मृत्यूदर कमी होत आहे़ मध्यम स्वरुपाच्या रुग्णांसाठी शहरात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असावे, यामुळे गंभीर रुग्णांवर अधीक लक्ष केंद्रीत करता येईल़क्वारंटाईन करणे म्हणजे जेल नव्हे, तो उपचाराचा व पुढील गंभीर बाबी टाळण्याचा एक भाग आहे़ रुग्ण व नातेवाईकांनी याला न भीता समोर यावे, कोविड रुग्णालयात रुग्ण स्वत: हून येतात त्यांना आता भीती नाही़- डॉ़ दत्तात्रय बिराजदार, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

टॅग्स :Jalgaonजळगाव