पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या चिंग्याला शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 12:31 PM2020-01-11T12:31:50+5:302020-01-11T12:32:18+5:30

जळगाव : पहारा ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयाची कॉलर पकडून धमकी दिल्याप्रकरणी चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे (३४) यास शुक्रवारी ...

Penalty for catching a police collar | पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या चिंग्याला शिक्षा

पोलिसाची कॉलर पकडणाऱ्या चिंग्याला शिक्षा

googlenewsNext

जळगाव : पहारा ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाºयाची कॉलर पकडून धमकी दिल्याप्रकरणी चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे (३४) यास शुक्रवारी दोषी धरून एक आणि तीन वर्षे सक्तमजुरी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़जी़ ठुबे यांनी हा निकाल दिला.
४ जुलै २०१४ रोजी पोलीस हवालदार पुरूषोत्तम सुपडू लोहार हे शहर पोलीस ठाण्यात पहारा ड्युटीवर होते़ त्यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ७ संशयित होते. रात्री १०़१० वाजेच्या सुमारास चिंग्या हा तेथे आला व त्याने आपणास कोठडीतील सुरेश ठाकरे व अन्य दोन जणांना भेटायचे असल्याचे सांगितले. त्यास लोहार यांनी नकार दिला. त्यावर चिंग्याने त्यांची कॉलर पकडून धमकी देत शिवीगाळ केली़
सरकारपक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले़ भादंवि कलम ३५३ प्रमाणे तीन वर्षे तसेच भादंवि कलम ५०६ प्रमाणे एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व १ हजार रूपयांचा दंड ठोठावला़ सरकारपक्षातर्फे अ‍ॅड़ पंढरीनाथ चौधरी व सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले़
चिंग्या आहे आधीच जन्मठेपेच्या शिक्षेत
काही महिन्यांपूर्वीच चिंग्या याला खून प्रकरणात जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ शुक्रवारी सुध्दा पोलिसाच्या कॉलर पकडण्याच्या प्रकरणात न्यायालयीन कामासाठी त्याला नाशिकहून आणण्यात आले होते़

Web Title: Penalty for catching a police collar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव