पारोळ्याजवळ कंटनेरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 17:21 IST2019-09-09T17:20:38+5:302019-09-09T17:21:04+5:30
कंटेनरने रस्त्याजवळून जाणाºया ४० वर्षीय शेतमजुरास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पारोळ्याजवळ कंटनेरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पारोळा, जि.जळगाव : कंटेनरने रस्त्याजवळून जाणाºया ४० वर्षीय शेतमजुरास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दळवेल गावानजीक ९ रोजी सकाळी ११ वाजता हा अपघात झाला.
धुळ्याकडून जळगावकडे जाणाºया कंटेनरने (क्रमांक एमएच-४९-१०९७) दळवेल गावाजवळील गतिरोधकावर वाहनाचा वेग कमी केला. तेव्हा रस्त्याच्या बाजूने जात असलेला शेतमजूर कृष्णा भास्कर महाले हा मागील चाकात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका जबरदस्त होता की, मयताच्या शरीराची चाळणी झाली होती.
कंटेनर चालक रोहन देवराव हरसुले हा वाहनात साहित्य घेऊन नागपूरकडे जात होता.
जि.प. सदस्य रोहिदास पाटील, रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर यांनी मदतकार्य केले. मयताच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.
याबाबत गुलाबसिंंग गिरासे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून चालकाविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास हे.काँ.इकबाल शेख करत आहे.