24 तासात थकबाकी भरा, अन्यथा बँकेला सील

By admin | Published: April 1, 2017 01:41 PM2017-04-01T13:41:09+5:302017-04-01T13:41:09+5:30

वारंवार नोटीस देऊनही थकबाकी भरली जात नसल्याने 24 तासात थकबाकी भरा अन्यथा बँकेला सील लावण्यात येईल, असा इशारा स्टेट बँकेच्या भुसावळ शाखेला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिला आहे.

Paying off the balance in 24 hours, otherwise seal the bank | 24 तासात थकबाकी भरा, अन्यथा बँकेला सील

24 तासात थकबाकी भरा, अन्यथा बँकेला सील

Next

जिल्हाधिका:यांची तंबी : एक कोटी 72 लाखाची थकबाकी
भुसावळ, जि. जळगाव, दि. 1-  : वारंवार नोटीस देऊनही थकबाकी भरली जात नसल्याने 24 तासात थकबाकी भरा अन्यथा बँकेला सील लावण्यात येईल, असा इशारा स्टेट बँकेच्या भुसावळ शाखेला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिला आहे.
शहरात एका इमारतीत स्टेट बँकेचे कार्यालय अनेक वर्षापासून आह़े संबंधित जागा मालकाने पालिकेची 2010 ते 2017 र्पयतची एक कोटी 72 लाख नऊ हजार 211 रुपयांची थकबाकी न भरल्याने पालिकेतर्फे यापूर्वी नोटीस बजावण्यात आल्या. तरीदेखील संबंधित जागा मालकाने दखल न घेतल्याने शनिवारी सकाळी  पालिकेचे पथक थेट स्टेट बँकेला सील लावण्यासाठी पोहोचल़े त्यावेळी  जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर  यांनी स्टेट बँकेच्या अधिका:यांशी संवाद साधून तातडीने थकबाकी भरण्याच्या सूचना दिल्या़ 24 तासात थकबाकी न भरल्यास पालिका सील लावण्याची कारवाई करेल, असेही बजावण्यात आल़े

Web Title: Paying off the balance in 24 hours, otherwise seal the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.