भुसावळात माजी नगरसेवकाने स्वखर्चाने केले ढापे तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 16:42 IST2018-12-07T16:41:46+5:302018-12-07T16:42:39+5:30
भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ शहरातील माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी प्रभाग अठरामध्ये पदरमोड करून चार ढापे तयार केले. ...

भुसावळात माजी नगरसेवकाने स्वखर्चाने केले ढापे तयार
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहरातील माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी प्रभाग अठरामध्ये पदरमोड करून चार ढापे तयार केले.
प्रभागातील चार ढापे तुटल्याने वारंवार याविषयी दुरुस्तीसाठी पालिकेकडे मागणी केली. याचा काही उपयोग झाला नाही. ढाप्यांंमध्ये शाळकरी मुले, वाहने व छोटे-मोठे अपघात नित्याची बाब झाली होती.
प्रभागातील नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय झाली होती. अखेर पदरमोड करून माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी १५ हजार रुपये खर्च करून प्रभाग अकरामधील गंगाराम प्लॉट भागातील मित्र मंडळ, सत्कार मंडळ, शिवराय मंडळ व आनंद मंडळाच्या मागील भागातील गटारीवर तुटलेल्या ढाप्यांची दुरुस्ती केली. इतरही अनेक कार्य खर्चातूनच करावे लागत असल्याचे प्रभागातील नगरसेविका मीनाक्षी धांडे यांनी सांगितले.
खडका रोडवरील मनियार हॉलजवळही रस्त्याच्या मधोमध ढापा तुटला आहे. तेथेही ढाप्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.