रिक्षात बसलेल्या सहप्रवाशाने तरुणाच्या पाकिटातून चोरले साडेसात हजार रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 21:29 IST2021-02-07T21:26:58+5:302021-02-07T21:29:04+5:30
जळगाव - रिक्षाप्रवासात एका सहप्रवाशाने दुसऱ्या प्रवासी तरुणाच्या पाकिटातून साडेसात हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार ६ जानेवारी रोजी दुपारी ...

रिक्षात बसलेल्या सहप्रवाशाने तरुणाच्या पाकिटातून चोरले साडेसात हजार रुपये
जळगाव - रिक्षाप्रवासात एका सहप्रवाशाने दुसऱ्या प्रवासी तरुणाच्या पाकिटातून साडेसात हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार ६ जानेवारी रोजी दुपारी ३.४५ ते ३.५५ वाजेच्या दरम्यान शाहुनगर परिसरात घडला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोदा येथील रहिवासी गणेश शांताराम पाटील जैन कंपनीत कामाला आहेत. शनिवारी दुपारची शिफ्ट असल्याने ते, तीन वाजेच्या सुमारास बांभोरी जाण्यासाठी गांधी मार्केटजवळून रिक्षात बसले. यात पूर्वीपासूनच दोन प्रवासी बसलेले होते. रिक्षात बसतानाच मी गुटखा खाल्ला आहे असे सांगत गणेश पाटील यांना दोघांनीमध्ये बसण्यास सांगितले. दोघांच्यामध्ये बसल्यावर रिक्षा निघाली. पिंप्राळा रेल्वेगेटजवळ रिक्षा असतानाच खिश्यातील पाकीट गायब झाल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी खिसे तपासले. रिक्षा थांबवल्यावर रिक्षाच्या सीटवर त्यांचे पाकीट आढळून आले. मात्र, त्यातील साडेसात हजार रुपये दोघा चोरट्यांनी लंपास केले होते. पैशांची विचारणा केली असता वाद होऊन रिक्षा चालकाने गणेश पाटलांना खाली उतरवून सुसाट रिक्षा घेत पळ काढला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करत आहेत.