अचानक प्रकृती बिघडलयाने प्रवाश्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:07 IST2019-11-27T22:06:54+5:302019-11-27T22:07:09+5:30
जळगाव : रेल्वेत प्रवास करत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने राममाल रोहीनीमाल (३३, रा.मुळ रतनपूर ब्लॉक ओंदा जि.बगपुरा) या तरुणाचा ...

अचानक प्रकृती बिघडलयाने प्रवाश्याचा मृत्यू
जळगाव: रेल्वेत प्रवास करत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने राममाल रोहीनीमाल (३३, रा.मुळ रतनपूर ब्लॉक ओंदा जि.बगपुरा) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. लोहमार्ग पोलिसांनी या तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. खिशात असलेल्या चिठ्ठीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क पोलिसांनी साधल्यानंतर तरूणाची ओळख पटली. तो रतनपूर येथून तो अहमदाबाद येथे जाण्यासाठी कविगुरू एक्सप्रेसने प्रवास करत होता. सहायक फौजदार बाबुलाल खरात तसेच पोलीस कॉन्स्टेबल योगेश अडकमोल यांनी पंचनामा केला. जळगाव येथेच तरूणावर अंत्यसंस्कार करण्यात आला. तरूणाच्या पश्चात पत्नी तसेच एक बहिण असा परिवार आहे.