चालकांचा आंदोलनात सहभाग, मग काय..चक्क कुलसचिव आले विद्यापीठात स्कुटरने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:13 IST2020-09-25T21:13:21+5:302020-09-25T21:13:27+5:30

दुस-या दिवशीही लेखनी बंद आंदोलन सुरूच : कुलगुरू, प्र-कुलगुरू स्वत: वाहन चालवत आले विद्यापीठ

Participation of drivers in the agitation, then what..the registrar came to the university on a scooter | चालकांचा आंदोलनात सहभाग, मग काय..चक्क कुलसचिव आले विद्यापीठात स्कुटरने

चालकांचा आंदोलनात सहभाग, मग काय..चक्क कुलसचिव आले विद्यापीठात स्कुटरने

जळगाव : विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागावर्गीय संघटनाच्यावतीने विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुकरण्यात आलेले लेखनी बंद आंदोलन दुस-या दिवशीही सुरूच होते.
परिणामी, आंदोलनात विद्यापीठातील शासकीय वाहनांवरील चालक सुध्‍दा सहभागी असल्यामुळे शुक्रवारी सकाळी कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पी.पी.माहुलीकर हे त्यांच्या खाजगी वाहनाने स्वत: वाहन चालवत विद्यापीठात आले. त्याचप्रमाणे प्रभारी कुलसचिव प्रा.डॉ.बी.व्ही.पवार हे चक्क त्यांच्या स्कूटरने विद्यापीठात दाखल झाले होते.

आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराजवळ सर्व कर्मचाऱ्यांनी शारीरिक अंतर पाळून व कोरोनाच्या संदर्भांत प्रतिबंधात्म्क उपाय योजनांचा अमंल करीत एकत्र जमून शासनाने अद्याप दखल न घेतल्याने जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी रमेश शिंदे, डॉ.शामकांत भादलीकर, अनिल मनोरे, फुलचंद अग्रवाल, डॉ.सुनील पाटील, राजेश पाटील, राजेश सावळे, श्रीराम रतन पाटील, जयंत सोनवणे, अजमल जाधव, सुभाष पवार, सुनिल आढाव, वसंत वळवी, सुनील सपकाळे, सविता सोनकांबळे, राजू सोनवणे, शांताराम पाटील, पदमाकर कोठावदे, अरविंद गिरणारे, शिवाजी पाटील, दुर्योधन साळुंखे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Participation of drivers in the agitation, then what..the registrar came to the university on a scooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.