नेट-सेट कार्यशाळेत २५२ विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST2021-09-12T04:21:38+5:302021-09-12T04:21:38+5:30

जळगाव : मूळजी जेठा महाविद्यालयात भाषा प्रशाळेच्या वतीने नेट-सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध ...

Participation of 252 students in net-set workshop | नेट-सेट कार्यशाळेत २५२ विद्यार्थ्यांचा सहभाग

नेट-सेट कार्यशाळेत २५२ विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव : मूळजी जेठा महाविद्यालयात भाषा प्रशाळेच्या वतीने नेट-सेट परीक्षा प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील २५२ विद्यार्थी सहभागी झाले होते.

१ ते ९ सप्टेंबरदरम्यान ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गुरुवारी या कार्यशाळेचा समारोप झाला. कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या विषयांच्या दुसऱ्या पेपरसाठीचे १ ते ५ सप्टेंबर या कालावधीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. हरेश शेळके, अहमदनगर, डॉ. संदीप माळी, डॉ. अतुल देशमुख, भडगाव, डॉ. राहुल पाटील, जव्हार, डॉ. प्रकाश शेवाळे, डॉ. विलास धनवे यांनी मराठी विषयाचे मार्गदर्शन केले. डॉ. दुर्गेश बोरसे, डॉ. अतुल सूर्यवंशी, डॉ. पंडित चव्हाण, प्रा. नितीन पाटील, डॉ. गजानन पाटील यांनी इंग्रजी विषयासाठी मार्गदर्शन केले. डॉ. कृष्णा गायकवाड, डॉ. मनोज महाजन, डॉ. रोशनी पवार, डॉ. विजय लोहार, डॉ. विजय सोनजे यांनी हिंदी विषयासाठी, तर डॉ. मुग्धा गाडगीळ, डॉ. नीलेश जोशी, डॉ. रूपाली कविश्वर, डॉ. संभाजी पाटील व डॉ. स्वानंद पुंड यांनी संस्कृत विषयासाठी मार्गदर्शन केले. त्यानंतर सेट/नेट परीक्षेच्या पहिल्या पेपरसाठी ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रा. राजीव पवार, डॉ. अतुल सूर्यवंशी, डॉ. लीना भोळे, डॉ. केतन चौधरी व डॉ. चेतन महाजन यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे, भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र केसूर, मराठी विभागप्रमुख डॉ. विद्या पाटील, हिंदी विभागप्रमुख डॉ. रोशनी पवार व संस्कृत विभागप्रमुख डॉ. भाग्यश्री भलवतकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. अनिल क्षीरसागर यांनी केले.

Web Title: Participation of 252 students in net-set workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.