पारोळ्याच्या लाचखोर सहायक निरीक्षकास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 12:48 IST2021-02-21T12:46:00+5:302021-02-21T12:48:36+5:30

अमळनेर : पारोळा येथील लाचप्रकरणातील सहायक फौजदार जगदीश विनायक पवार याला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी ...

Parola's corrupt assistant inspector in police custody | पारोळ्याच्या लाचखोर सहायक निरीक्षकास पोलीस कोठडी

पारोळ्याच्या लाचखोर सहायक निरीक्षकास पोलीस कोठडी


अमळनेर : पारोळा येथील लाचप्रकरणातील सहायक फौजदार जगदीश विनायक पवार याला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी पवार याला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले असता सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला की आरोपीच्या अंगझडतीत एक डायरी आढळून आली असून त्यावर त्याच्या हस्ताक्षरात वाहन क्रमांक आणि त्यापुढे रक्कम लिहिलेले असून ही अवैध वाहतुकीची हप्त्याची रक्कम आहे का ? यात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे का? आणि आरोपीच्या हस्ताक्षराचे नमुने , त्याने गोळा केलेली अपसंपदा याबाबत चौकशीसाठी 5 दिवसांची कोठडीची मागणी केली होती न्या व्ही आर जोशी यांनी 4 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.

Web Title: Parola's corrupt assistant inspector in police custody