पारोळा तालुका काँग्रेस कमेटीला गतवैभव प्राप्त करून देवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 17:44 IST2020-02-02T17:42:29+5:302020-02-02T17:44:07+5:30

तालुका काँग्रेस कमेटीची नुकतीच बैठक जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली.

Parola Taluka Congress Committee will get past glory | पारोळा तालुका काँग्रेस कमेटीला गतवैभव प्राप्त करून देवू

पारोळा तालुका काँग्रेस कमेटीला गतवैभव प्राप्त करून देवू

ठळक मुद्देमाजी मंत्री शोभा बच्छाव यांचे प्रतिपादनपारोळा येथे काँग्रेस कमेटीची बैठक

पारोळा, जि.जळगाव : तालुका काँग्रेस कमेटीची नुकतीच बैठक जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात पार पडली. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ.बच्छाव यांनी पारोळा तालुक्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ‘एकात्मतेचे दर्शन’ या कार्यक्रमात त्यांनी, आपण सर्व कार्यकर्ते समाजा-समाजामध्ये जाऊन समता व बंधुता यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
काँग्रेस पक्ष भेदभाव न करता सर्वांना सामावून घेणारा असा हा पक्ष राष्ट्रीय पक्ष असून आपण सर्वांनी एक दिलाने काम करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
पारोळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांनी या तालुक्यात आम्ही काँग्रेस पक्षाचे अस्तित्वात टिकवून ठेवले आहे. पक्ष वाढीसाठी गाव तेथे पक्षाची शाखा स्थापना करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रामराव पाटील, माजी तालुकाध्यक्ष उमेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हासराव बाबा, नामदेव भिका महाजन, अपंग सेलचे अध्यक्ष सुरेश भाई, मनोहर पाटील, बी.जी. पाटील, अनिल अनुष्ठान, दशरथ अहिर, बापू वाडीले, सुरेश पाटोळे, स्वप्नील पाटील, संजय महाजन, प्रकाश वानखेडे, माजी सैनिक अर्जुन सरदार, ज्ञानेश्वर पाटील, अरुण पाटील, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Parola Taluka Congress Committee will get past glory