पारोळा येथे ४६ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 18:34 IST2021-05-09T18:34:25+5:302021-05-09T18:34:48+5:30

श्री दीप रक्तसेवा धुळे व संजीवनी मेडीकल चोरवड रोड पारोळा यांचा स्तुत्य उपक्रम आहे.

At Parola, 46 people donated blood | पारोळा येथे ४६ जणांनी केले रक्तदान

पारोळा येथे ४६ जणांनी केले रक्तदान

पारोळा : श्री दीप रक्त सेवा ग्रुप धुळे व संजीवनी मेडिकल पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबिराचे आयोजन ८ रोजी संजीवनी मेडिकल चोरवड रोड या ठिकाणी करण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रक्तपेढीतील रक्तसाठा दिवसेंदिवस अत्यल्प होत असताना संजीवनी मेडिकलचे संचालक संदीप माने, मल्हार कुंभार, पारोळा शहर तलाठी निशिकांत माने व श्रीकृष्ण युवा ग्रुप यांनी यांनी रक्तदान शिबिर आयोजीत केले.  

शिबिरास तहसीलदार अनिल गवांदे यांनी भेट देउन उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरात एकूण ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरास श्रीकृष्ण युवा गृप चोरवड रोड यांचे सहकार्य  लाभले.

 

Web Title: At Parola, 46 people donated blood