पंत आणि शमी यांनी केले एकमेकांना ट्रोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:20 IST2021-09-06T04:20:51+5:302021-09-06T04:20:51+5:30
लंडन : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा ३१ वर्षांचा झाला. त्यावर यष्टीरक्षक ऋषभ पंत याने त्याला शुभेच्छा ...

पंत आणि शमी यांनी केले एकमेकांना ट्रोल
लंडन : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा ३१ वर्षांचा झाला. त्यावर यष्टीरक्षक ऋषभ पंत याने त्याला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी तो म्हणाला की, शमी, बॉल आणि वय दोन्ही खूप वेगाने निघून जात आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !, त्यावर उत्तर दिले नसते तर तो शमी कसला, शमीने लिहिले की, माझी वेळ येईल, वय आणि वेगाने होणारी गोलंदाजी कुणीच थांबवू शकत नाही; पण बॉडी फॅटवर मात्र उपाय केला जाऊ शकतो.’ शमी हा शुक्रवारी ३१ वर्षांचा झाला आहे.
...तर रहाणेचा आत्मविश्वास कमी होईल -लक्ष्मण
नवी दिल्ली : भारतीय संघ व्यवस्थापनाने चौथ्या कसोटीत अजिंक्य रहाणे याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. त्याला असेच खालच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले तर त्याचा आत्मविश्वास कमी होईल, असे मत भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण याने व्यक्त केले. त्याने म्हटले की, रहाणे हा अनुभवी फलंदाज आहे. रहाणे याने पहिल्या तीन कसोटीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.’
बटलरला दुसरे कन्यारत्न
लंडन : इंग्लंडचा यष्टीरक्षक जोश बटलर याची पत्नी लुईस हिने दुसऱ्यांदा मुलीला जन्म दिला आहे. या बाळाच्या जन्मासाठीच बटलरने या मालिकेतील तिसऱ्या कसोटीनंतर माघार घेतली. सध्या तो कुटुंबासोबत आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, पाच सप्टेंबर आणि जोश बेबीचे स्वागत, रॉयल फॅमिली’ जोशची पहिली मुलगी जॉर्जिया रोज ही एप्रिल २०१९ मध्ये जन्माला आली होती.