संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:21 IST2021-09-12T04:21:07+5:302021-09-12T04:21:07+5:30
या महिला भजनी मंडळाच्यावतीने गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यतिथी आणि पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. भजनी मंडळातील काही ...

संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळा
या महिला भजनी मंडळाच्यावतीने गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यतिथी आणि पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. भजनी मंडळातील काही महिला या कोरोनाचे दोन वर्षे वगळता प्रत्येक वर्षी हा पुण्यतिथी सोहळा शेगाव येथे जाऊन साजरा करत होते; परंतु या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे मंदिर बंद असल्यामुळे संत सावता महाराज भजनी मंडळाच्या सर्व महिला या गुढे येथेच गजानन महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा करत आहेत.
भजनी मंडळामधे तीस ते चाळीस महिला असून, नेहमी धार्मिक कार्यक्रमांमध्ये भजनाचे आयोजन करत असतात. या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये तीन दिवस भजन-कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. प्रसादाचा कार्यक्रमदेखील महिला भजनी मंडळाच्यावतीने ठेवण्यात येतो. पुण्यतिथीदिवशी पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व भजनी मंडळाच्या महिला तसेच महादू महाजन, निंबा महाराज, बापू पाटील, वासुदेव माळी, सावता माळी, आबा माळी आदी उपस्थित होते.
110921\img_20210911_171743.jpg
संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या महिला आणि पालखी