शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

पाचोरा तालुका पाणी टंचाईमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 22:53 IST

जलसाठे ५० टक्के असल्याने तालुका झाला टँकरमुक्त

पाचोरा : सततच्या दुष्काळाने दरवर्षी तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते, मात्र यावर्षी तालुक्यातील जलसाठ्यात आद्यपही मुबलक पाणी साठा असल्याने पाचोरा तालुक्यातील १२८ गावांना यंदा पाणीटंचाई भासत नसून तालुका पाणी टंचाईमुक्त झाला असल्याची माहिती पाचोरा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय अभियंता एस एस पवार यांनी दिली.पाचोरा तालुक्यात १०० ग्रामपंचायत असून १२८ गावे आहेत.सर्वच गावांना नळ पाणीपुरवठा योजना भारत निर्माण, स्वजलधारा,जल स्वराज, आदी योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो.तालुक्यात ३ मध्यम प्रकल्प हिवरा,बहुळा, अग्नावती, असून १५ लघु प्रकल्प राजुरी, पिंप्री सार्वे,गहुले, पिंपळगाव हरे, अटलगव्हाण, कोल्हे, सातंगाव,डांभुर्णी पिंप्री, बांबरुड रा प्राबो वाकडी, म्हसळा, गारखेडा, गाळण, दिघी, खाजोळा यासह गिरणा प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा होतो. तर १३पाझर तलाव तालुक्यात असून गिरणा नदीवरील योजनांद्वारे गिरणा काठावरील गावांना पाणीपुरवठा केला जातो. सन २०१९-२० ह्या वर्षात पाचोरा तालुक्यात सुमारे १५० टक्के पाऊस झाला. सर्व नद्यांना महापुर आले ,तर धरण साठे १०० टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी देखील पाटाद्वारे पाणी सोडण्याची वेळ आली नाही .