पाचोरा ग्रामीण रुग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:23+5:302021-09-13T04:15:23+5:30
या अतिक्रमणामुळे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिका लावण्यास पार्किंग करण्यास जागा नसल्याने, त्यांना वाहतुकीच्या रोडवरच पार्क करणे व रुग्णांना सोडून ...

पाचोरा ग्रामीण रुग्णालय अतिक्रमणाच्या विळख्यात
या अतिक्रमणामुळे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिका लावण्यास पार्किंग करण्यास जागा नसल्याने, त्यांना वाहतुकीच्या रोडवरच पार्क करणे व रुग्णांना सोडून उभ्या कराव्या लागत आहेत. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आणल्यावर वाहनधारकांना या ठिकाणी अतिक्रमण व इतर बेकायदेशीर वाहन पार्किंगचा सामना करावा लागत असून, अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे बऱ्याच वेळा मोटारसायकली व इतर वाहनधारकांशी हुज्जत होऊन वाद होत आहेत. त्यातच रुग्णालयात शेजारी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय असल्याने त्यांचीही वाहने ‘नो पार्किंग झोन’मध्येच बेकायदेशीर व वाहतुकीला अडथळा करीत पार्क करावे लागत असतानाही या अतिक्रमणाकडे का दुर्लक्ष होत आहे? कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी असतानाही अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत असल्याने, कर्मचारी, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचा आदेश पायदळी तुडवून परस्पर हितसंबंध जोपासत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
या रुग्णालयाच्या समोर सिटी सर्व्हे कार्यालय आहे, तसेच स्टॅम्प व्हेंडर यांना जुन्या पडक्या रुग्णालय परिसरात जागा असल्याने तेथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या शेकडोंनी मोटारसायकली रस्त्यातच उभ्या असल्याने, पोलीस स्टेशन आवारातच वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने न.पा. प्रशासनाने अतिक्रमण हटवावे व पोलिसांनी अस्ताव्यस्त वाहन पार्किंगवर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाचोरा परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असून, पालिकेने लक्ष देणे अपेक्षित आहे. आमच्या रुग्णवाहिका वाहने पार्क करण्यासाठी जागाच नसते. रस्त्यात अस्ताव्यस्त वाहने उभी असतात. यामुळे अत्यावश्यक रुग्ण आणताना रुग्णवाहिकेला बराच सामना करावा लागतो. या करिता या समस्या सोडवाव्यात.
- डॉ.अमित साळुंखे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय.