पाचोऱ्यात जुगार अड्डयावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 21:26 IST2018-04-13T21:26:54+5:302018-04-13T21:26:54+5:30
पाचोरा शहरातील सारोळा रस्त्यावरील आयटीआय च्या बाजूला असलेल्या जुगार अड्डयावर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने गुरुवार १२ रोजी धाड टाकून १० जणांना अटक केली.

पाचोऱ्यात जुगार अड्डयावर धाड
आॅनलाईन लोकमत
पाचोरा,दि.१३ : पाचोरा शहरातील सारोळा रस्त्यावरील आयटीआय च्या बाजूला असलेल्या जुगार अड्डयावर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव पथकाने यांच्या गुरुवार १२ रोजी धाड टाकून १० जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ३५ हजार ५३० रुपयांची रोकड जप्त केली आहे.
पाचोरा शहरातील सारोळा रस्त्यावरील आयटीआयजवळ जुगार अड्डा सुरु असल्याची गोपीनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईसाठी पथकाची नियुक्ती केली. या पथकाने गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत झन्ना-मन्ना जुगार खेळताना १० जणांना अटक केली. यावेळी रोख रक्कम ३५ हजार ५३० व जुगाराचे साहित्य मोबाईल हस्तगत केले. यावेळी पाचोरा येथील ललित रमेश देशमुख, गोविंदा अशोक चौधरी, रवींद्र भीमराव पाटील, प्रकाश रमेश शिंदे, राजेंद्र भिका पाटील, संजय एकनाथ ठाकूर,जयराम शंकर महाजन , संजय नामदेव चव्हाण यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.