शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

मक्तेदाराने आणलेली चोरीची वाळू दुसऱ्या माफियांनी पळवली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 21:34 IST

जळगाव : सध्या वाळू ठेके बंद असल्याने बांधकामासाठी नदीपात्रातून बेकायदेशिर पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. आव्हाणे येथे रस्त्यांचे काम ...

जळगाव : सध्या वाळू ठेके बंद असल्याने बांधकामासाठी नदीपात्रातून बेकायदेशिर पध्दतीने वाळू उपसा सुरु आहे. आव्हाणे येथे रस्त्यांचे काम सुरु करण्यात आले. मात्र, वाळूअभावी हे काम देखील संथ गतीने सुरु आहे. मक्तेदाराने काम सुरु व्हावे यासाठी काही वाळू व्यावसायिकांच्या मदतीने बेकायदेशिर पध्दतीने आणलेली वाळू देखील रात्रीच्या वेळेस वाळू माफियांनी चोरून नेल्याचा प्रकार आव्हाणे येथे घडला आहे.३० सप्टेंबरपर्यंतच जिल्ह्यातील वाळूच्या ठेक्यांची मुदत होती. ही मुदत संपली असून नवीन ठेक्यांचे लिलाव अद्याप प्रशासनाकडून सुरुकरण्यात आलेले नाही. शासनाकडून सुरु असलेल्या रस्त्यांचे काम देखील बंद आहेत. दरम्यान, आव्हाणे येथे सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्यांचे कामे गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. २०० मीटरच्या रस्त्याचे काम तीन महिन्यांपासून सुरु असल्याने ग्रामस्थांनी संबधित मक्तेदाराला हे काम लवकर करण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर मक्तेदाराने काही वाळू व्यावसायिकांकडून वाळू खरेदी केली. शुक्रवारी दुपारी पाच ते सहा डंपर वाळू काम सुरु असल्याचा ठिकाणी टाकण्यात आली होती. मात्र, रात्रभरातच काही माफियांनी रस्त्याचा कामासाठी टाकण्यात आलेली वाळू देखील लांबवली. त्यामुळे ‘चोरावर मोर शिरजोर’ असल्याचा प्रकार आव्हाणे येथे घडला आहे.तेरी भी चूप मेरी भी चूपसध्या वाळू ठेके बंद असल्याने आणलेली वाळू ही बेकायदेशिरच समजली जाणार आहे. त्यामुळे मक्तेदाराने चोरलेल्या वाळू बाबत तक्रार देखील केली नाही. या प्रकरणात मक्तेदारालाही चुप्पी साधतच बसावे लागले. दरम्यान, वाळू ठेके बंद असले तरी तरीही बांधकामे सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गिरणा व तापी नदीला काही महिन्यांपासून प्रचंड पूर असल्याने वाळू उपसा पुर्णपणे बंद होता. मात्र, आता गिरणेतील पुराचे पाणी कमी झाल्यामुळे वाळू माफियांनी गिरणेचे पुन्हा लचके तोडायला सुरुवात झाली आहे.रात्रीच्या वेळेस कानळदा रस्त्यावरून जाणेही कठीणरात्री १० वाजेनंतर वाळू माफियांकडून वाळू उपसा करायला सुरुवात होते. पहाटे ६ वाजेपर्यंत प्रशासनाच्या नाकावर टीच्चून वाळू माफियांकडून सर्रासपणे वाळू उपसा केला जात आहे. आव्हाणे व निमखेडी भागातील गिरणा नदीपात्रात सर्वाधिक उपसा होत आहे. रात्री १० वाजेनंतर कानळदा रस्त्यालगत भरधाव वेगाने वाळूचे डंपर व ट्रॅक्टर धावत असल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून वाहतूक करणे देखील मोठे जिकरीचे झाले आहे. महसूल प्रशासन मात्र या प्रकरणी आंधळेपणाचीच भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव