चोपडा-जळगाव बसमधून लांबविले लाखाचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 23:00 IST2018-04-23T23:00:39+5:302018-04-23T23:00:39+5:30

चोपडा- जळगाव बसधून प्रवास करणाऱ्या नंदा अनिल पाटील (वय २०, रा.मुळे, ता.चोपडा) या महिलेचे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम दागिने लांबविल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली़

ornaments long chopda-Jalgaon bus | चोपडा-जळगाव बसमधून लांबविले लाखाचे दागिने

चोपडा-जळगाव बसमधून लांबविले लाखाचे दागिने

ठळक मुद्देचोपडा-जळगाव बसमध्ये लांबविले लाखाचे दागिनेएस.टी.बसमध्ये सिटाखाली ठेवला होता दागिने असलेली बॅगजिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिली अज्ञात चोरट्याविरूद्ध फिर्याद

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२३ : चोपडा- जळगाव बसधून प्रवास करणाऱ्या नंदा अनिल पाटील (वय २०, रा.मुळे, ता.चोपडा) या महिलेचे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम दागिने लांबविल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली़
नंदा अनिल पाटील या २३ रोजी सकाळी १० वाजता चोपडा येथून चोपडा- जळगाव बसने जळगावला येत होत्या. नंदा पाटील ज्या शिटवर बसल्या होत्या त्यांच्या मागील शिटच्या खाली त्यांनी आपली बॅग ठेवली होती. या बॅगत डबा ठेवला होता व त्यात ६० हजार रुपये किमतीच्या चोन्याच्या दहा गॅमच्या दोन साखळ्या, १५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅमचे सोन्याचे ब्रेसलेट असा एकुण एक लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ठेवला होता.
नंदा पाटील या जळगाव बसस्थानकात उतरत असताना त्यांनी बॅग काढली व बॅग उघडून पाहिली असता त्यातील डबा गायब झालेला होता. याबाबत त्यांनी जिल्हापेठला फिर्याद दिली.

Web Title: ornaments long chopda-Jalgaon bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.