शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गोटे विरोधकांना भाजपात खुर्ची!

By admin | Updated: April 27, 2017 00:35 IST

विविध पक्षांचे सात नगरसेवक भाजपामध्ये

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सोनल शिंदे यांच्यासह सात जणांना बुधवारी पुण्यात भाजपात प्रवेश देण्यात आला़ भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला़  यामुळे आमदार अनिल गोटे यांचा विरोध डावलून       त्यांच्या विरोधकांना भाजपमध्ये स्थान देण्यात आल्याची राजकीय वतरुळात चर्चा         आहे. महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग़्रेसच्या नगरसेवकांना भाजपात प्रवेश न देता स्वपक्षीयांनाच बळ द्यावे असा सूर आमदार अनिल गोटे यांनी मंगळवारी पक्षाच्या बैठकीत आळवला होता. परंतु त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या सात जणांनी बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला़ यानिमित्ताने भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत़ माजी उपमहापौर फारूख शाह हे  गेल्या वर्षी आमदार अनिल गोटेंच्या विरोधात पुढे आल्याने बरेच वादविवाद झाले होत़े शिवाय शिवसेना नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी आमदार गोटेंविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या धरणे आंदोलनातदेखील फारूख शाह सहभागी झाले होत़े अजूनही सत्ताधारी पक्षाचे अनेक नगरसेवक भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.सर्वपक्षीय पदाधिका:यांचा प्रवेश भाजपात प्रवेश केलेल्यांमध्ये  महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा  राष्ट्रवादीचे नगरसेवक सोनल शिंदे, माजी उपमहापौर फारूख शाह, माजी महिला व बालकल्याण सभापती जुलाहा रश्मीबानो, अपक्ष  नगरसेवक फिरोज लाला, शिवसेना पुरस्कृत नगरसेविका शकुंतला जाधव, माजी नगरसेवक भिकन वराडे व सुनील पाटील यांचा समावेश आहे. यापैकी वराडे व पाटील वगळता इतर पाच जण विद्यमान नगरसेवक आहेत.