शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जळगावात ‘लोटस’चेच ‘ऑपरेशन’, शिवसेनेचा महापौर; २७ नगरसेवक फुटले भाजपची सत्ता गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 06:43 IST

या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला बहुमतापेक्षाही जास्त मते मिळाली. काही दिवसांपूर्वी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ऑपरेशन लोटस्‌’ यशस्वी करत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली.

जळगाव: भारतीय जनता पक्षाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने जळगाव महापालिकेत सांगली पॅटर्नच्या धर्तीवर सत्तांतर घडवून आणले. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला, तर उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील विजयी झाले.  भाजपचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा त्यांनी १५ मतांनी पराभव केला.या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला बहुमतापेक्षाही जास्त मते मिळाली. काही दिवसांपूर्वी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ऑपरेशन लोटस्‌’ यशस्वी करत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. त्याचीच पुनर्रावृत्ती जळगावात झाली. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. मात्र, अडीच वर्षांतच भाजपला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे. आ. सुरेश भोळे यांच्याविरुद्ध असलेली नाराजी, भाजपकडून देण्यात आलेल्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला असलेला विरोध यामुळे भाजपचे तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाले. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत शिवसेनेने यश मिळवले.भाजप सुप्रीम कोर्टात जाणार - महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पीठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला. पीठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध   सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा भाजपने दिला. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाJalgaonजळगावShiv Senaशिवसेना