वाढत्या लोकसंख्येचे पोषण फक्त शेतकरीच करू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:43+5:302021-07-14T04:19:43+5:30
देशातला ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. उर्वरित ३० टक्के भागात निम्म्यापेक्षा जास्त वने, जंगले आहेत. उर्वरित भाग शेतीसाठी ...

वाढत्या लोकसंख्येचे पोषण फक्त शेतकरीच करू शकतो
देशातला ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. उर्वरित ३० टक्के भागात निम्म्यापेक्षा जास्त वने, जंगले आहेत. उर्वरित भाग शेतीसाठी उपयोगाचा आहे. असे असताना भारत ८० टक्के कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु, आजही आपला देश विकसित नसून विकसनशीलच आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कमीच आहे. शेती व उद्योगधंद्यांतून भारताची आर्थिक गरज भागविली जाते. परकीय चलन फुगवट्यामुळेसुद्धा भारताच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत असतो. आज भारतातील प्रत्येक व्यक्तीवर कर्जाचा बोजा आहेच. यासाठी आपल्या कृषीप्रधान देशात शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशाला विकसित करण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन शेती व शेतकरी वाढवण्यासाठीच्या योजना राबविल्या पाहिजेत. तरच, या वाढत्या लोकसंख्येचे उदरपोषण फक्त शेतकरीच करू शकतो, अशीही प्रतिक्रिया बाविस्कर यांनी दिली आहे.