शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त परिसरात रेन पाईप ठिबक संचाद्वारे कांदा लावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 09:33 IST

माळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे.

ठळक मुद्देमाळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे.गहू लावून उत्पन्न येते त्यापेक्षा कांद्यापासून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी गव्हापेक्षा केव्हाही कांदा लावणे पसंत करतात.डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतात रांगडा कांदा लावणी केली आहे.

हर्षद गांधी 

निजामपूर : माळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे.

यंदा वर्षभरात केवळ एक पाऊस झाला. परिणामी निजामपूर, जैताणे परिसरात भीषण दुष्काळ पसरला आहे. शेतांमधील विहिरी, बोअर आटलेत. जे थोडे फार पाणी आहे त्यात कांदा लावणे कठीण असल्याचे शेतकरी म्हणतात. परिणामी या भागात कांदा लावणीचे प्रमाण तुलनेने फारच कमी झाले आहे.

जेवढ्या क्षेत्रात गहू लावून उत्पन्न येते त्यापेक्षा कांद्यापासून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याने शेतकरी गव्हापेक्षा केव्हाही कांदा लावणे पसंत करतात. पाणी नाही ही अडचण आता पुढे येते आहे. परंतु अल्प प्रमाणातील पाण्याचा रेन पाईप ठिबक सिंचन पद्धतीने वापर करून उपलब्ध पाण्यात कांद्याचे पीक घेता येते, हे सिद्ध झाल्याने शेतकरी त्याकडे वळत आहे.

निजामपूर, उमरांडी, जैताणे शिवारात काही शेतकऱ्यांकडून इतरत्र बसविले जातात तसे ‘रेन पाईप ठिबक संच’ लावून कांदा लावणी करण्यात येत आहे. या ठिबक सिंचन संचाद्वारे उभ्या पाईपमधून 14 फुटाच्या गोल परिसरात पावसासारखे फवारे उडतात. त्यामुळे पुरेसे पाणी मिळून पिकाची चांगली वाढ होते. यामुळे पाणी सुद्धा कमी लागत असल्याची माहिती रुपेश श्रीधर राणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतात रांगडा कांदा लावणी केली आहे. त्यांनी अपेक्षिल्याप्रमाणे ही लावणी झाली आहे. हा प्रयोग या क्षेत्रात नवीन असून साधारणत: 20 ते 25 टक्के शेतकऱ्यांनी हे ठिबक संच बसविले असल्याचे शेतकरी राणे यांनी नमूद केले. त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी 12 ते 13 हजार रुपये खर्च आला आहे. या पद्धतीने उपलब्ध पाण्यावर कांदे लावणीचे क्षेत्र दुप्पटीने वाढू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. या ठिबक पद्धतीने पाइपाच्या दोन्ही बाजूस 7-7 फूट अंतरापर्यंत स्प्रेच्या सहाय्याने पिकांना पावसाप्रमाणे पाणी मिळते. त्याचा पिकांच्या वाढीसाठी चांगला उपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

साक्री तालुक्यातील यंदा दुष्काळग्रस्त घोषित निजामपूर, जैताणे व पश्चिमेकडील कोकणपट्टीत यंदा भीषण दुष्काळामुळे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी हे ‘रेन पाईप ठिबक संच’ बसवून उपलब्ध अल्प पाण्यावर कांद्याची लावणी केली आहे.

- रूपेश श्रीधर राणे,शेतकरी, निजामपूर, ता.साक्री

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरीonionकांदाWaterपाणी