अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात एकास तीन वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 18:58 IST2019-04-11T18:56:36+5:302019-04-11T18:58:39+5:30

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात जावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोपाळ भिमराव कापसे (३४, रा.न्हावे, ता.चाळीसगाव) या आरोपीला न्यायालयाने गुरुवारी तीन वर्ष सश्रम कारावास व साडे चार हजार रुपयाचा दंड तर अ‍ॅट्रासिटीच्या कलमाखाली दोन वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर यांनी हा निकाल दिला.

One-three-year imprisonment for minor girl molestation case | अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात एकास तीन वर्ष कारावास

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात एकास तीन वर्ष कारावास

ठळक मुद्दे जळगाव न्यायालयाचा निकाल   चार कलमांमध्ये धरले दोषी

जळगाव : पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात जावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोपाळ भिमराव कापसे (३४, रा.न्हावे, ता.चाळीसगाव) या आरोपीला न्यायालयाने गुरुवारी तीन वर्ष सश्रम कारावास व साडे चार हजार रुपयाचा दंड तर अ‍ॅट्रासिटीच्या कलमाखाली दोन वर्ष कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर यांनी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, २२ मे २०१५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता पीडित तरुणी घरात एकटी असल्याची संधी साधून गोपाळ याने पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करुन पीडितेशी अश्लिल वर्तन केले होते. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गोपाळ कापसे याच्याविरुध्द विनयभंग, बाललैंगिक अत्याचार व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी तथा उपअधीक्षक केशव पातोंड यांनी चौकशीअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. पीडित मुलगी, तिची आई व तपासाधिकाºयांची साक्ष ग्राह्य धरुन न्या.जे.पी.दरेकर यांनी गोपाळ याला दोषी धरले. सरकारतर्फे अ‍ॅड.शिला गोडंबे यांनी बाजू मांडली.
असे कलम, अशी शिक्षा
कलम ३५४ अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम ४५२ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम ८ अंतर्गत तीन वर्ष सश्रम कारावास, एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद व अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत दोन वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद व पीडित मुलीस दंडाच्या रकमेपैकी ४ हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

Web Title: One-three-year imprisonment for minor girl molestation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.