आदर्श गाव वडगाव बुद्रूक येथे एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:02 IST2018-08-17T22:02:03+5:302018-08-17T22:02:38+5:30

कुºहाडीने केले दोन घाव, आरोपीस अटक

One murdered in Adgaon village, Vadgaon Budruk | आदर्श गाव वडगाव बुद्रूक येथे एकाचा खून

आदर्श गाव वडगाव बुद्रूक येथे एकाचा खून


अडावद, ता.चोपडा : चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रूक येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मरिमातेच्या मंदिराजवळ मंगल गायकवाड (भिल) याने गणेश भिल याचा कुºहाडीने घाव घालून खून केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ हसरत भिल (वय ३६) रा.वडगाव याच्या घरात घुसून मंगल धनसिंग गायकवाड (भिल) याने दशरथ भिल याच्या पत्नीचा हात धरून तिच्याशी अंगलट करण्यास सुरूवात केली. दशरथने त्यास पत्नीपासून दूर केले. याचा राग आल्याने त्याने दोन्ही हाताने दशरथ भिलचा गळा दाबला असता त्याच्या तावडीतून सुटून बाहेर पळाला. मंगल कुºहाड घेऊन त्याच्या मागे धावला. त्याला चुकवत दशरथ मरिमातेच्या ओट्याआड लपला. मरिमातेच्या ओट्यावर बसलेल्या रामदास भिल याने हा कुºहाड घेऊन कुणामागे धावतो, असे बोलला म्हणून मंगलने रामदासवर कुºहाड उगारली. मात्र तेथेच मासे पकडण्याचे जाळे विणत बसलेला त्याचा सासरा गणेश सुका भिल (वय ४५) हा मंगल भिल यास थांबविण्यास गेला असता त्याने गणेशच्या मानेवर व डोक्यावर कुºहाडीने दोन वार केले. ग्रामस्थांंनी मंगल भिल यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. जखमी गणेश भिल यास प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. याबाबत दशरथ भिल याच्या फिर्यादीवरून अडावद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गजानन राठोड करीत आहे.

Web Title: One murdered in Adgaon village, Vadgaon Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.