अगळनेर-ढेकूरोडवरील अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 14:59 IST2019-04-21T14:58:50+5:302019-04-21T14:59:38+5:30

रिक्षा आणि मोटरसायकलची धडक

One killed in accident on Agalner-Dhamrod | अगळनेर-ढेकूरोडवरील अपघातात एक ठार

अगळनेर-ढेकूरोडवरील अपघातात एक ठार



अमळनेर : ढेकूरोड वर लामा जीन समोर रस्त्यावर मोटरसायकल व मालवाहतूक रिक्षा यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला आहे. अपघात इतका भीषण होता की मोटारसायकल स्वार रस्त्यावर धडकेत आपटून ठार झाला आहे.
रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अमळनेर कडून प्रवीण पंढरीनाथ पाटील (रा ढेकू अंबासन) हा मोटारसायकल क्र एम एच १९ ए सी ८८१९ या काळ्या रंगाच्या दुचाकीने जात असताना ढेकूसीम कडून येणाऱ्या पॅजो रिक्षा क्र.एम एच १५ आर ५३२९ या पॅजो रिक्षाची समोरासमोर धडक दिली.
यात प्रवीण पंढरीनाथ पाटील हा जागीच ठार झाला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

Web Title: One killed in accident on Agalner-Dhamrod

टॅग्स :Accidentअपघात