ट्रॅक्टर चोरी प्रकरणात एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:49 IST2020-01-22T12:49:36+5:302020-01-22T12:49:51+5:30
जळगाव : जळगाव , धुळे व बुलडाणा जिल्ह्यात ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या सागर हरिश्चंद्र वांजोळे (२५, ...

ट्रॅक्टर चोरी प्रकरणात एकाला अटक
जळगाव : जळगाव, धुळे व बुलडाणा जिल्ह्यात ट्रॅक्टर चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षापासून फरार असलेल्या सागर हरिश्चंद्र वांजोळे (२५, रा.बोरगाव, ता.चिखली, जि.बुलडाणा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याच्या मुळ गावावरुन अटक केली. सागरने जळगाव, धुळे, जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅक्टर चोरी केले असून या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या नेतृत्वाखाली विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अनिल देशमुख, विनोद पाटील, प्रवीण हिवराळे व पोपट सोनार यांच्या पथकाने सागरला जेरबंद केले.