दीड हजार विद्यार्थ्यांनी दिली पेट परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 20:04 IST2019-11-04T20:03:33+5:302019-11-04T20:04:39+5:30
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेत सोमवारी शेवटच्या दिवशी १५३ विद्याद्यार्थ्यांनी भाषा विषयाची ...

दीड हजार विद्यार्थ्यांनी दिली पेट परीक्षा
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेत सोमवारी शेवटच्या दिवशी १५३ विद्याद्यार्थ्यांनी भाषा विषयाची आॅनलाईन परीक्षा दिली. एकूण चार दिवस चालेल्या या परीक्षेत २ हजार ६८५ पैकी १ हजार ५१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
१ नोव्हेंबर पासून विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्या इमारतीत असलेल्या आॅनलाईन परीक्षा केंद्रावर रोज चार बॅचेस मध्ये पेट परीक्षा पार पडली. नऊ परीक्षा हॉल मध्ये २३३ संगणकांवर ही परीक्षा झाली. सोमवारी शेवटच्या दिवशी भाषा विषयासाठी २७३ पैकी १५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १२० विद्यार्थी गैरहजर होते. या पेट परीक्षेसाठी एकूण २ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी १ हजार ५१० विद्यार्थी हजर होते. १ हजार १७५ विद्यार्थी गैरहजर राहिले.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षांचे नियोजन करण्यात आले. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांच्या समवेत केंद्र प्रमुख प्रा.एस.टी.इंगळे, मुख्यसमन्वयक प्रा. समीर नारखेडे, उपकुलसचिव अे.सी.मनोरे, जी.एन.पवार, दाऊदी हुसेन, प्रा.मनोज पाटील व इतर सहकाऱ्यांनी परीश्रम घेतले. सोमवारी प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य प्रमोद पवार, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य लता मोरे तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.नितीन बारी यांनी भेट दिली.