गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगावात कापूस खरेदीला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 15:19 IST2023-09-19T15:12:10+5:302023-09-19T15:19:00+5:30

नवीन कापसाला ७०५३ तर जुन्या कापसाला ७६०० रुपये भाव

On the occasion of Ganesh Chaturthi, cotton purchase starts in Dharangaon | गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगावात कापूस खरेदीला प्रारंभ

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर धरणगावात कापूस खरेदीला प्रारंभ

भगीरथ माळी, लोकमत न्युज नेटवर्क, धरणगाव (जि.जळगाव): जिल्ह्यात कापसाचे हब समजल्या जाणाऱ्या धरणगाव येथे गणेश चतुर्थीच्या  मुहूर्तावर मंगळवारी कापूस खरेदीस प्रारंभ झाला. नवीन कापसाला ७,०५३ रुपये तर जुन्या कापसाला ७,६०० रुपये एवढा भाव मिळाला. महावीर कॉटनमध्ये नवीन कापसाला ७,१११  तर कृष्णा कॉटन येथे नवीन कापसाला ७,०३१ रुपये एवढा भाव देण्यात आला.

श्रीजी जिनिंगमध्ये कापूस खरेदीस प्रारंभ झाला.  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते काटा पूजन करण्यात आले. यावेळी जिनिंगचे संचालक नयन गुजराथी, जीवनसिह बयस, सुरेश चौधरी, निलेश चौधरी, प्रवेश सराफ, सागर करवा,  निखिल बयस, राकेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन उपस्थित होते.

Web Title: On the occasion of Ganesh Chaturthi, cotton purchase starts in Dharangaon

टॅग्स :cottonकापूस