जळगाव : ३१ डिसेंबरच्या रात्री किरकोळ वादातून तरुणाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 09:37 IST2023-01-01T09:36:39+5:302023-01-01T09:37:44+5:30

१७ जण ताब्यात. 

On the night of December 31 a young man was killed in a petty dispute | जळगाव : ३१ डिसेंबरच्या रात्री किरकोळ वादातून तरुणाचा खून 

जळगाव : ३१ डिसेंबरच्या रात्री किरकोळ वादातून तरुणाचा खून 

भगीरथ माळी
धरणगाव (जळगाव) : येथील कृष्णा जिनिंगमध्ये कालू सोनवणे या तीस वर्षीय तरुणाचा किरकोळ वादातून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना ३१ डिसेंबरच्या रात्री ८.३० वाजता घडली. 

कृष्णा जिनिंगमध्ये ३१ रोजी रात्री कालू सोंनवणे हा बिहारी तरुणांना रात्री ताटे वाजवू नका, मुले झोपली आहेत, असे सांगायला गेला होता. या कारणावरून वाद झाला. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यातील एकाने कालूच्या डोक्यात लोखंडी वस्तू टाकल्याने तो जागीच ठार झाला. त्यानंतर सर्व मारेकरी फरार झाले.  

पोलिसांनी रात्रभर आजूबाजूचा परिसर पिंजून काढत सतरा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, विनोद संदानशिव, पोलीस नाईक मिलिंद सोनार, पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील ,मनोज पाटील,महेश देवरे, जितेंद्र पाटील, महेश पाटील यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.

Web Title: On the night of December 31 a young man was killed in a petty dispute