ओम परिचय केंद्र दुर्बल घटकातील महिलांचे पालकत्व स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:00+5:302021-09-13T04:17:00+5:30

अशोर पारधे यांची निवड जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवक जिल्हाध्यक्षपदी अशोक पारधे यांची निवड करण्यात आली ...

Om Parichay Kendra will take care of women from weaker sections | ओम परिचय केंद्र दुर्बल घटकातील महिलांचे पालकत्व स्वीकारणार

ओम परिचय केंद्र दुर्बल घटकातील महिलांचे पालकत्व स्वीकारणार

अशोर पारधे यांची निवड

जळगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) युवक जिल्हाध्यक्षपदी अशोक पारधे यांची निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे व जिल्हाध्यक्ष दीपक सपकाळे यांच्या मान्यतेने पारधे यांची निवड करण्यात आली आहे.

रस्त्यांवरील बेशिस्त वाहनांमुळे वाहतूककोंडी

जळगाव : शहरातील नेहरू चौकाकडून टॉवर चौकाकडे जातांना रस्त्यावरच बेशिस्तरीत्या दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सध्या गणेशोत्सव काळात या रस्त्यावरील वाहनांमुळे अधिकच कोंडी होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासाने या बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांची गैरसोय

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात दररोज अधूनमधून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या ठिकठिकाणच्या शाखा कार्यालयांमधील कर्मचारी दूरध्वनी उचलत नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे, तसेच रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही दिवसभर अधूनमधून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Om Parichay Kendra will take care of women from weaker sections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.