गुरुवारपासून ऑलिम्पिक जागरण उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST2021-07-14T04:19:14+5:302021-07-14T04:19:14+5:30
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव जिल्हा क्रीडा विभाग, नूतन मराठा महाविद्यालय आणि व्ही. एस. नाईक ...

गुरुवारपासून ऑलिम्पिक जागरण उपक्रम
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव जिल्हा क्रीडा विभाग, नूतन मराठा महाविद्यालय आणि व्ही. एस. नाईक महाविद्यालय, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक जागरण उपक्रमाचे आयोजन १५ ते २० जुलै यादरम्यान करण्यात आले आहे. गुरुवारी या उपक्रमाचे उद्घाटन प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्याहस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
हा उपक्रम १५ ते २० जुलै या कालावधीत सकाळी ८ ते १० या वेळेत ऑनलाईन झूम ॲप आणि यु ट्यूब लाईव्हवर आयोजित केला आहे. या उपक्रमात विविध क्रीडा प्रकारातील माजी ऑलिम्पिक खेळाडू व आंतरराष्ट्रीय खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यकमाची लिंक प्राप्त करून घेण्यासाठी प्रा. उमेश पाटील व प्रा. सुभाष वानखेडे यांच्याकडे नोंदणी करावी, असे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी कळविले आहे.