शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वृद्ध बहिणीने चुलत भावाला दिली आपली संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 9:44 PM

मजरे हिंगोणा येथील इंदुबाई बुधा महाले (७८) या वृद्ध महिलेने सख्ख्या चुलत भावाला सर्व मालमत्ता देऊन टाकली.

ठळक मुद्देअहो आश्चर्यच चोपडा तालुक्यातील हिंगोणा येथील सत्य कथा

चोपडा : यापूर्वी मदतीच्या अनेक घटना आपण ऐकलेल्या आहेत, परंतु ही चोपडा तालुक्यातील मजरे हिंगोणा येथील दानशूर महिलेची चर्चा तालुकाभर नव्हे तर जिल्हाभर सुरू आहे. सध्या स्पर्धेच्या युगात एक रुपयाही कोणी कोणाला देणे लांबचा भाग झालेला असताना मजरे हिंगोणा येथील इंदुबाई बुधा महाले (७८) या वृद्ध महिलेने सख्ख्या चुलत भावाला सर्व मालमत्ता देऊन टाकली. बक्षीस देण्याची या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.इंदुबाई बुधा महाले या महिलेने रोजंदारीवर भिवंडी येथे काम करणारा चुलत भाऊ रामा महाले यास बोलावून सगळे सोपस्कार पूर्ण करून रीतसर कागदपत्रे बनवून स्वकष्टाने कमावलेली सर्व संपत्ती, त्यामध्ये सोने, बांधीव घर, रिकामी जागा, शेती, त्यासाठी बैलजोडी व सर्व साहित्य, वि.का.संस्थेतील शेअर्स, साखर कारखान्यातील शेअर्स हे सगळे भावाला देऊन टाकले आणि प्रत्यक्ष भावाला इथे बोलावून अनभिज्ञ असलेल्या या भावाने तुला द्यायचे आहे, असं सांगितल्यावर मात्र भाऊ आवाक झाला. पोटच्या पोराला किंवा सख्या आई-वडिलांना सध्या या धकाधकीच्या जीवनात प्रॉपर्टी देणे हे दुरापास्त झाले आहे. मात्र दानशूर व्यक्ती या समाजामध्ये आहेत याचेच हे उदाहरण या घटनेतून दिसून येत आहे. महिलेने स्वत:च्या मालकीचे सध्या राहत असलेले भलेमोठे सिमेंट काँक्रीटचे घर, सोन्याच्या दहा तोळ्याच्या बांगड्या, बखळ जागा या हंगामातील आलेले सर्व उत्पन्न, घरात भरून ठेवले आहे ते उत्पन्न अशी लाखो रुपयांची संपत्ती चुलत भावाला देऊन टाकली आहे.एवढेच नव्हे तर या वृद्ध महिलेने मनातील इच्छा जिवंतपणीच पूर्ण करणार असल्याचे जाहीरही केले आहे. वयाने थकले असताना केव्हाही काहीही होऊ शकते म्हणून जिवंत असतानाच मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मिळत नसल्यामुळे या नवदुर्गा उत्सवाच्या काळातच मौजे आणि मजरे हिंगोणा या दोन्ही गावांमधील संपूर्ण कुटुंबांना ह्यगाव जेवणह्ण देणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. बहिणीने सर्व प्रॉपर्टी भावाला देऊ केल्यानंतर भावाचे डोळे पाणावले. स्वकष्टाने कमावलेली सर्व संपत्ती चुलत भावाला देण्याची ही कदाचित जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात पहिलीच घटना असावी, असेही सर्वत्र बोलले जात आहे.

टॅग्स :SocialसामाजिकChopdaचोपडा