जळगाव जिल्ह्यात वीज तारांमध्ये अडकलेली शेळी काढायला गेलेल्या वृध्दाचा वीजेच्या धक्कयाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 16:40 IST2018-03-20T16:40:13+5:302018-03-20T16:40:13+5:30
वादळ वा-यामुळे तुटलेल्या वीज तारांमध्ये अडकलेली बकरी काढण्यासाठी गेलेल्या अजुर्न गिरधर सोनवणे (वय ५५) यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता तालुक्यातील मोहाडी शिवारात घडली. यासोबतच वीजेच्या धक्क्याने एक शेळी व एका बोकडचाही मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात वीज तारांमध्ये अडकलेली शेळी काढायला गेलेल्या वृध्दाचा वीजेच्या धक्कयाने मृत्यू
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२० : वादळ वा-यामुळे तुटलेल्या वीज तारांमध्ये अडकलेली बकरी काढण्यासाठी गेलेल्या अजुर्न गिरधर सोनवणे (वय ५५) यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता तालुक्यातील मोहाडी शिवारात घडली. यासोबतच वीजेच्या धक्क्याने एक शेळी व एका बोकडचाही मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री शहर व परिसरात अचानक वादळ वारा व पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली तर वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडीत झाला होता. मोहाडी शिवारातही वीज तारा तुटल्या होत्या. सकाळी या तारांमध्ये वीजेचा प्रवाह होता.मंगळवारी सकाळी अजुर्न सोनवणे हे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले असता तुटलेल्या वीज तारांना स्पर्श झाल्याने शेळी व बोकडाचा मृत्यू झाला. या तारांमध्ये ही शेळी अडकली असावी म्हणून सोनवणे शेळीला बाहेर काढण्यासाठी तेथे गेले असता तारांमधील वीज प्रवाहाच्या धक्क्याने ते जागीच गतप्राण झाले. हा प्रकार शेतातील अन्य लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी धनंजय सानेवणे व अन्य जणांनी वीज पुरवठा खंडीत करुन सोनवणे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रतिलाल पवार यांनी पंचनामा व कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण करुन शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सोनवणे यांच्या पश्चात पत्नी नलुबाई, मुलगी संदीप, हेमंत, सून व मुलगी योगिता असा परिवार आहे.